TET-P1= मराठी 2024 June 13, 2026 by rashkeanmol123@gmail.com TET-P1= मराठी 2024 1 / 30 ‘माधुरी अतिशय हुशार आहे.’ या वाक्याचे अकरणरूपी वाक्य कोणते ? माधुरी हुशार नाही माधुरी खूप हुशार नाही माधुरी अजिबात मठ्ठ नाही माधुरी खूप मठ्ठ आहे 2 / 30 ‘यथान्याय’ या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता ? न्यायासाठी न्यायाप्रमाणे न्यायापर्यंत न्यायाशिवाय 3 / 30 ‘कृष्णासम पाठीराखा माझा बंधुराया.’ वरील ओळीतील अलंकार कोणता ? उपमा अनुप्रास उत्प्रेक्षा यमक 4 / 30 ‘अलिकडे पाऊसाचे प्रमान खुप कमी झाल्याने वृक्षारोपण मोहिम राबवली पाहीजे.’ या वाक्यात अशुद्ध शब्द किती आहेत ? सहा पाच सात चार 5 / 30 मी विचारले तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता या वाक्यात किती विरामचिन्हे येतील ? दोन तीन चार पाच 6 / 30 ‘भाकरी’ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे ? तेलुगू पोर्तुगीज कानडी फारसी 7 / 30 यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र पुढीलपैकी कोणते ? सह्याद्रीचे वारे कन्हेचे पाणी कृष्णाकाठ कृष्णकमळ 8 / 30 प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या व्यक्तीस तुम्ही कोणते पत्र लिहिणार ? अभिनंदन पत्र निमंत्रण पत्र आभार पत्र तक्रार पत्र 9 / 30 अभंगांच्या ओळी व रचनाकार यांची विसंगत जोडी ओळखा. निंबा कडूपण देत असे कोण। वृक्षा गोडपण कवण करी ॥ — संत बहिणाबाई धरिला पंढरीचा चोर। गळां बांधोनिया दोर ॥ — संत जनाबाई ऐसे कैसे जाले भोंदू। कर्म करोनि म्हणती साधु ॥ — संत तुकाराम माझें माहेर पंढरी। सुखें नांदु भीमातीरीं ॥ — संत निर्मळा 10 / 30 कविता आधारित: देवाने डोळे का मिटले असावेत ? भक्तांचे स्मरण करण्यासाठी झालेली जीवितहानी पाहून मंदिरातील गीत-घोष श्रवणासाठी जगज्जेत्यांचा विजय पाहून 11 / 30 कवितेतील ‘प्रेषित’ या शब्दाचा अर्थ कोणता ? सैतान पराक्रम स्फूर्ती देवदूत 12 / 30 कवीच्या मते ईश्वराचा वास कोठे असतो ? पराक्रमी, क्रूर व्यक्तींच्या ठायी फक्त मंदिराच्या गाभाऱ्यात प्रेमळ व क्षमाशील व्यक्तींच्या ठायी दुर्जन व्यक्तींच्या ठायी 13 / 30 खालील पर्यायांतून समानार्थी शब्दांची विसंगत जोडी ओळखा. लतिका — कन्या आदिम — मूळचा आस्था — आपुलकी फत्तर — दगड 14 / 30 पुढीलपैकी भिन्न अर्थाचा वाक्प्रचार कोणता ? धाबे दणाणणे पोटात गोळा येणे अंगाचा थरकाप उडणे अंगाचा तिळपापड होणे 15 / 30 विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी कोणती ? अनुरूप x विजोड आवृत्त x परावृत्त कोवळे x निबर टवटवीत x मलूल 16 / 30 ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या म्हणीचा अर्थ कोणता ? सर्व व्यक्ती सारख्याच स्वभावाच्या असतात व्यक्ती-व्यक्तींच्या आचारविचारत भिन्नता असते सर्व व्यक्तींमध्ये साम्य असते सर्व व्यक्तींची मनोवृत्ती भिन्न नसते 17 / 30 संवादात मतभेदाचे अवघड विषय टाळले जातात कारण : (अ) एकमेकांची मते ठाऊक असतात. (ब) हट्टी स्वभावाची जाणीव असते. (क) स्वाभिमानाची ठिकाणे माहीत असतात. फक्त (अ) बरोबर फक्त (ब) बरोबर फक्त (अ), (क) बरोबर (अ), (ब), (क) बरोबर 18 / 30 उताऱ्यानुसार संवाद साधताना कोणती दक्षता घ्यावी ? समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाणार नाही याची स्वतःचेच म्हणणे खरे करण्याची नेहमी स्वहितास प्राधान्य देण्याची समोरच्या व्यक्तीच्या दोषांकडे दुर्लक्ष करण्याची 19 / 30 ‘मामाने भाचीस बोलकी बाहुली आणली’ या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता ? गुणवाचक विशेषण संख्यावाचक विशेषण सार्वनामिक विशेषण धातुसाधित विशेषण 20 / 30 ‘कर्नल संतोष महाडीक आपल्या तुकडीसह पुढे सरसावले’. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय 21 / 30 ‘आम्ही पूर्ण दिवस पाण्यात डुंबलो.’ अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ कोणता ? कर्म अधिकरण करण संप्रदान 22 / 30 पुढीलपैकी नपुंसकलिंगी नाम ओळखा : फुगे धागे सोगे वांगे 23 / 30 ‘आम्हाला उत्कर्षाचा अन् प्रगतीचा मार्ग दिसला.’ या वाक्यातील विधेय भाग ओळखा. मार्ग दिसला आम्हाला दिसला प्रगतीचा मार्ग दिसला आम्हाला मार्ग दिसला 24 / 30 ‘शंकर सावकाराच्या कचाट्यात गवसू नये, म्हणून मी त्याला मदत केली.’ वरील वाक्याचा प्रकार ओळखा. केवल मिश्र संयुक्त आज्ञाार्थी 25 / 30 पुढीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता ? थ् ळ् ख् स् 26 / 30 संधीप्रकारानुसार विसंगत पर्याय कोणता ? महौदार्य गंगौघ दुर्दैव जनैक्य 27 / 30 पुढीलपैकी अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते ? डोंगरावर हिरवेगार गवत उगवले होते. पक्षी अंगणात दाणे टिपतात. श्रावणीने नवीन पैठणी आणली. ताईने अंगणात पानाफुलांची रांगोळी काढली. 28 / 30 दिलेल्या आकृतीतील म्हण ओळखून अनुक्रमे दुसऱ्या व सातव्या क्रमांकांच्या अक्षरांनी तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायांतून निवडा. पाऊस ओंजळ पोकळ वृत्ती 29 / 30 ‘गावावर आलेल्या भीतिदायक संकटाचा गावकऱ्यांनी मिळून सामना केला.’ अधोरेखित शब्दसमूहास योग्य आलंकारिक शब्द कोणता ? गंडांतर इष्टापत्ती हमरीतुमरी पर्वणी 30 / 30 पुढीलपैकी समूहदर्शक शब्दांची अयोग्य जोडी कोणता ? मडक्यांची उतरंड प्रवाशांची झुंबड नाण्यांची चवड गवताचा भारा Your score isThe average score is 41% 0% Restart quiz