TET-P1= मराठी 2018 June 13, 2026 by rashkeanmol123@gmail.com TET-P1= मराठी 2018 1 / 30 समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा- आकर्ण–विकर्ण अंबु–सलिल हाता–जिता द्रुम–आलय 2 / 30 विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा- आगंतुक × निमंत्रित सुचिन्ह × अचिन्ह समर × संगर वामा × श्यामा 3 / 30 तद्भव शब्द ओळखा- विशेष व्यक्ती म्हैस मारक 4 / 30 पुढील नावामधून मंगेश पाडगावकर यांच्या कवितासंग्रहाचे नसलेले नाव ओळखा- धारानृत्य जिप्सी छोरी संहिता 5 / 30 लेखननियमांनुसार अचूक शब्द ओळखा- मुच्छित कूर्मावतार खंडन मंडन शोक संपत्त 6 / 30 ‘पुरुष’ या नाटकाचे लेखक कोण? प्रशांत दळवी अजित दळवी तुषार दळवी जयवंत दळवी 7 / 30 ‘शिवप्रिया’ हा सामासिक शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? बहुव्रीही तृतीया तत्पुरुष मध्यमपदलोपी द्विगु 8 / 30 ‘जलावतरण’ या संधीचा योग्य विग्रह ओळखा- जल+वतरण जला+अवतरण जल+अवतरण जला+वतरण 9 / 30 ‘दमयंतीस्वयंवर’ या काव्याचे कवी कोण? वामन पंडित रघुनाथ पंडित मोरोपंत निरंजन माधव 10 / 30 भाववाचक नसलेले नाम ओळखा- कटुता गोडवा कार्य 11 / 30 तत्सम शब्द ओळखा- विरक्त भाऊ डोके पाऊस 12 / 30 ‘या सत्तेत जीव रमत नाही’ हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? दया पवार रामदास आठवले नामदेव ढसाळ राजा ढाले 13 / 30 उभयान्वयी नसलेले अव्यय ओळखा- किंवा वाहवा वा व 14 / 30 विध्यर्थी नसलेले वाक्य ओळखा- पादत्राणे ओळीने ठेवावी या कामी देवाची कृपा व्हावी त्याने बसमध्ये माझ्यासाठी जागा धरावी माझ्यासाठी ही भाजी संध्याकाळला ठेव 15 / 30 पुढील नावामधून आत्मकथनपर पुस्तकाचे नाव ओळखा- इजिप्तायन श्यामली बॅरिस्टर गबाळ 16 / 30 ‘मी आंबे आणून आधी घालून ठेवलेत’ या वाक्याचा काळ ओळखा- पूर्ण वर्तमानकाळ अपूर्ण भूतकाळ रीती भविष्यकाळ अपूर्ण वर्तमानकाळ 17 / 30 एकवचन-अनेकवचनाची योग्य जोडी ओळखा- वाट-वाटे वाढपी-वाढपी जोडी-जोडे चूक-चुकी 18 / 30 पुल्लिंगी शब्द ओळखा- हकीकत वैभव पहाट रहाट 19 / 30 चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप ओळखा- कृत्य-कृत्य विक्री-विक्री युक्ती-युक्ती मोती-मोत्या 20 / 30 ‘आपले डावपेच आपल्यावरच उलटणे’ या अर्थाची म्हण ओळखा- पहिले पाढे पंचावन मुकी गाय फटके खाय गुरूची विद्या गुरूस फळली इकडे आड तिकडे विहीर 21 / 30 ‘सव्यापसव्य करणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा- धार्मिक विधी करणे यातायात करणे कर्मठ असणे मंत्रतंत्र करणे 22 / 30 उपसर्गघटित शब्द ओळखा- कुसंगती कुमार कुडी कुळवणी 23 / 30 प्रत्ययघटित शब्द ओळखा- ऐनवेळ निराकार पडसाद दिमाखदार 24 / 30 ‘काय हाहाकार माजवला भूकंपाने’ या वाक्यापुढे कोणते विरामचिन्ह हवे? पूर्णविराम उद्गारवाचक प्रश्नचिन्ह अपसारण चिन्ह 25 / 30 ‘माझ्या घरी जागेची मुळीच कमतरता नाही’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा- सप्तमी प्रथमा द्वितीया षष्ठी 26 / 30 ‘महाराष्ट्रात झालेला अवकाळी पाऊस प्रचंड नुकसान करून गेला’ या वाक्यात पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाही? विशेषण विशेषनाम सामान्यनाम सर्वनाम 27 / 30 “ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त? भरती मूर्खांचीच होत ना?” “एक तूच होसी जास्त” या काव्यपंक्तीत पुढीलपैकी कोणता रस आढळतो? करुणरस हास्यरस बीभत्सरस रौद्ररस 28 / 30 ‘इतिहास घडवण्याची संधी’ या शब्दप्रयोगातून पुढीलपैकी कोणता अर्थ अभिप्रेत आहे? इतिहासाचे लेखन करण्याची संधी इतिहासाबद्दल स्पष्टीकरण देणे इतिहासात नोंद होईल असे काही करून दाखविण्याची संधी इतिहाससंशोधनाची संधी 29 / 30 ‘पुरूषार्थ’ म्हणजे काय? पुरुषी सामर्थ्य सिद्ध करणे भित्रेपणावर मात करणे मानवाजन्माचे सार्थक करणे स्त्रियांवर वर्चस्व गाजविणे 30 / 30 ‘प्रवाहपतित होणे’ याचे चार अर्थ पुढे दिले आहेत. त्यांपैकी चुकीचा, गैरलागू अर्थ ओळखा- प्रवाहात पडून वहात जाणे परिस्थितीला शरण जाणे संघर्ष करण्याऐवजी माघार घेणे परिस्थितीवर विजय मिळवणे Your score isThe average score is 37% 0% Restart quiz
Very good